पक्षफुटीमुळं गेल्या काही महिन्यांपासून 'शिवसेना' हा पक्ष चर्चेत आहे. पण आता एका वेगळ्याच कारणासाठी तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या एका कट्टर शिवसैनिकानं आपल्या मुलीचं नावच 'शिवसेना' ठेवलं आहे. याद्वारे त्यानं बाळासाहेबांप्रती एक प्रकारे कृतज्ञताच व्यक्त केली आहे.